अॅडलेड : पाकिस्तानचा क्रिकेटर राहत अलीनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेन वॉटसनची कॅच सोडली... आणि याच कारणामुळे ट्विटरवर त्याचं नाव ट्रेन्डिंग होतंय.
सोशल वेबसाईट ट्विटरवर राहत अलीची अनेक क्रिकेटफॅन्सनं खिल्ली उडवलेली पाहायला मिळतेय.
राहत अलीने शेन वॉटसनची कॅच अशा वेळी सोडली जेव्हा ऑस्ट्रेलियाची स्थिती नाजूक होती. सोळाव्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर राहतने वॅटसनचा कॅच सोडला.
त्यावेळी ऑस्ट्रेलियानं ८३ रन्सवर ३ विकेटस् गमावलेल्या होत्या. यावेळी, वॉटसन ४ रन्सवर खेळत होता... आणि ही कॅच गमावत राहतनं ऑस्ट्रेलियाला विजयाचा मार्ग मोकळा करून दिला. राहतच्या हातातून बॉल निसटला आणि पाकिस्तानच्या हातातून मॅचही निसटली...
या कॅचची तुलना बऱ्याच जणांनी हर्शल गिब्सच्या कॅचशी केलीय. १९९९ साली गिब्सने अशीच स्टिव्ह वॉची साधी कॅच सोडली होती... आणि त्या एका कॅचनं दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा मार्ग दाखवला होता. ही कॅच आता राहत अलीच्या आयुष्यभर लक्षात राहील, यात काही शंका नाही.
सोशल वेबसाईटवर पाहायला मिळालेल्या या काही मजेदार प्रतिक्रिया...
— #IamwhatIam (@ImTeamGreen) March 20, 2015
Match harne ki credit goes to #RahatAli
#PakvsAus
— Me Jemiii || Zayn (@_NaveedSays) March 20, 2015
Aus played with 12 Players Including #RahatAli
@Ashikhan251 @MaheenAsif1 @GhazalaBaji @coo__kiee
— Ibn E Khalil (@Ibnekhalil85) March 20, 2015
Watson' s fifty credit goes to #RahatAli
— Sumaiya Hanif (@UmmeAmeer) March 20, 2015
noooo you didn't drop a catch .....#RahatAli You dropped today match #PAKvAUS
— Maira (@MairaAfridi) March 20, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.