'दिल्ली डेअरडेव्हिल्स'च्या विमानाला अपघात...

रायपूरच्या स्वामी विवेकानंद विमानतळावर शुक्रवारी सकाळी एक मोठी दूर्घटना होता-होता वाचली. 

Updated: May 8, 2015, 07:48 PM IST
'दिल्ली डेअरडेव्हिल्स'च्या विमानाला अपघात...  title=

रायपूर : रायपूरच्या स्वामी विवेकानंद विमानतळावर शुक्रवारी सकाळी एक मोठी दूर्घटना होता-होता वाचली. 

त्याचं झालं असं की, रनवेवर लॅंड झाल्यानंतर जेट एअरवेज आणि इंडिगोची विमानं एकमेकांच्या समोरा-समोर आली.

इंडिगोच्या विमानात कोलकातावरून रायपूरला आलेली दिल्ली डेअरडेव्हिल्सची टीम होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही विमानं एकाच वेळी रनवेवर आल्याने पायलेट थोडा वेळ भयभीत झाले होते.

पण, प्रसंगावधान राखून इंडिगोच्या पायलटने अचानक ब्रेक दाबले. त्यामुळे प्रवाशांना एक जोरात झटका बसला आणि मोठी विमान दूर्घटना टळली. जेट एअरवेजचं विमान त्याच वेळी रन-वेवून टेक ऑफ करत होतं

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.