नवी दिल्ली: सोशल मीडिया असा प्लॅटफॉर्म बनलाय जिथं आपली एक चूक खूप महागात पडते आणि क्षणार्धात वायरल होते. असंच काहीसं घडलंय माजी केंद्रीय मंत्री आणि बीसीसीआयचे पदाधिकारी राजीव शुक्ला यांच्यासोबत. त्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिलीप ह्यूजला अखेरचा अलविदा करत ट्वीट करून श्रद्धांजली वाहिली. मात्र ट्वीटमध्ये खूप मोठी चूक केली.
ह्युजला बुधवारी अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी जगभरातील क्रिकेट प्रेमींनी त्याला श्रद्धांजली दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर फिलीपच्या शोकसभेत सहभागी होऊ शकले नाही तर त्यांनी ट्विटरद्वारे फिलला श्रद्धांजली वाहिली. शुक्लांनी ट्वीटमध्ये फिलीपच्या नावाचं स्पेलिंग चुकवलं आणि कॉमा किंवा फुलस्टॉप न दिल्यानं, त्यांच्या ट्वीटच्या अर्थाचा अनर्थ झाला.
राजीव शुक्ला यांचं ट्वीट वाचा:
Heartfelt condolences to huge Ravi Shastri &Virat Kohli represented Bcci
— Rajeev Shukla (@ShuklaRajiv) December 3, 2014
त्यांच्या या ट्वीटनंतर त्यांची ट्विटरवर खिल्ली उडवली गेली. ह्यूजचं स्पेलिंग ‘Huge’ लिहिलं ज्याचा अर्थ मराठीत विशाल असा होतो आणि त्यांनी कॉमा किंवा फुलस्टॉप न देताच रवी शास्त्री आणि कोहलीचं नाव लिहिलं. त्यामुळं या ट्वीटचा पूर्ण अर्थच बदलून गेला.
दरम्यान, आता ते ट्वीट डिलीट केलं गेलं असून नवं ट्वीट राजीव शुक्लांनी केलंय. पण तेवढ्याच वेळात अनेकांनी ट्विटरवर रिप्लाय करून आणि रि-ट्विटकरून शुक्लांची खिल्ली उडवण्याची संधी सोडली नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.