ऑकलँड: आज क्रिकेट वर्ल्डकपची सेमीफायनलची पहिली मॅच झाली. न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेला हरवून फायनलमध्ये धडक मारलीय. या मॅचनंतर काही खास रेकॉर्ड्स तयार झालेत आणि काही खास फॅक्ट्स पाहूयात...
#बाउल्टनं आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये २१ विकेट्स घेतल्या आहेत आणि वर्ल्डकपमध्ये एका आवृत्तीमध्ये सर्वाधिक २० विकेट घेणाऱ्या ज्यौफ एलॉटला त्यानं मागे टाकलंय.
# एलॉटनं १९९९ वर्ल्डकपमध्ये नऊ मॅचमध्ये १६.२५च्या सरासरीनं २० विकेट घेतले होते. एलॉटनं दोन वेळा चार विकेट घेतल्या होत्या. ३७ रन्सवर चार विकेट चार विकेट त्याचं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन होतं.
# आज सेमीफायनलमध्ये भिडणाऱ्या दोन्ही टीम वर्ल्डकपमध्ये एकूण ९ वेळा सेमीफायनलमध्ये पोहोचल्या. मात्र आजपर्यंत वर्ल्डकप फायनलमध्ये प्रवेश करू शकली नव्हती. पण आज पहिल्यांदा न्यूझीलंड फायनलमध्ये पोहोचली. दक्षिण आफ्रिका - ३ वेळा आणि न्यूझीलंड ६ वेळा सेमीफायनलमध्ये पोहोचली.
# या वर्ल्डकपमध्ये पहिले बॅटिंग करतांना दक्षिण आफ्रिकेच्या टीमनं ३००+ रन्स केले. तर आयर्लंड आणि वेस्ट इंडिज विरुद्ध टीमनं ४००+चा स्कोअर केलाय.
# पाऊस सुरू होण्यापूर्वी आपल्या ६० रन्सच्या खेळीमध्ये एबी डिव्हिलिअर्स एका वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक रन्स बनवणाऱ्या साऊथ आफ्रिका टीमचा दुसरा खेळाडू बनलाय. आता त्याच्या पुढे फक्त जॅक कॅलिय ४८५ रन्ससोबत आहे.
# न्यूझीलंडचा धमाकेदार बॅट्समन मार्टिन गपटिलनं आज २ रन्स करून क्रिकेट वर्ल्डकपमध्ये आपले ५०० रन्स पूर्ण केलेय.
# न्यूझीलंडनं आज पहिल्या ५ ओव्हरमध्ये ७१ रन्स घेतले. यासोबतच २००१ वर्षानंतर आतापर्यंत ५ ओव्हरमध्ये दुसरा सर्वाधिक स्कोअर आहे. यापूर्वी २००७मध्ये सुद्धा न्यूझीलंडनं बांग्लादेशविरुद्ध ५ ओव्हरमध्ये ७८ रन्स बनवले होते. तेव्हा टीमचे ७१ रन्सच्या स्कोअरमध्ये ५९ रन्स कॅप्टन मॅक्कुलमचे होते.
# आज आपल्या ३४ रन्सच्या बॅटिंग दरम्यान ३ चौकार लावून गपटिलनं वर्ल्डकप २०१५मध्ये ५८ चौकार लावून सर्वाधिक चौकार लगावणारा बॅट्समन बनलाय. त्यानं संगकाराला मागे टाकलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.