‘क्रिकेटचा आवाज’ म्हणून ओळखले जाणारे रिची बेनॉ यांचं निधन

ऑस्ट्रेलियाचे माजी कॅप्टन रिची बोनॉ यांच वयाच्या ८४व्या वर्षी निधन झालंय. रिची बेनॉ हे ऑस्ट्रेलियाचे ऑल राऊंडर क्रिकेटर होते. उत्तम लेग स्पिनर आणि उपयुक्त लोअर ऑर्डर बॅटसमन अशी त्यांची ओळख होती.

Updated: Apr 10, 2015, 11:47 AM IST
‘क्रिकेटचा आवाज’ म्हणून ओळखले जाणारे रिची बेनॉ यांचं निधन title=

नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाचे माजी कॅप्टन रिची बोनॉ यांच वयाच्या ८४व्या वर्षी निधन झालंय. रिची बेनॉ हे ऑस्ट्रेलियाचे ऑल राऊंडर क्रिकेटर होते. उत्तम लेग स्पिनर आणि उपयुक्त लोअर ऑर्डर बॅटसमन अशी त्यांची ओळख होती.

१९५८मध्ये ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टन्सीची धुरा त्यांच्याकडे सोपविण्यात आली. तेव्हापासून ते १९६४ पर्यंत ते ऑस्ट्रेलियाचे कॅप्टन होते. कॅप्टन म्हणूनच त्यांनी निवृत्ती स्वीकारली. त्यानंतर त्यांनी क्रिकेट कॉमेंट्री करताना स्वतःची एक वेगळी शैली आणि आवाज यामुळे ओळख निर्माण केली. सध्याच्या पिढीली विविध क्रिकेट गेम्समध्येही त्यांच्याच आवाजातील कॉमेंट्री ऐकायला मिळते.

दरम्यान, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं ट्विटरवरून रिची बोनॉ यांना श्रद्धांजली वाहिलीय.

#RIPRichie Wonderful personality who was always warm and encouraging. Had great insights on the game (1/3)

— sachin tendulkar (@sachin_rt) April 10, 2015

fondly remember our discussion on the art of leg spin along with Official @ShaneWarne in Sharjah. Last spoke to him late last year. (2/3)

— sachin tendulkar (@sachin_rt) April 10, 2015

Was not well but full of enthusiasm. Great loss to the world of cricket. Heartfelt condolences to Richie's family and friends (3/3)

— sachin tendulkar (@sachin_rt) April 10, 2015

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.