ब्रिटीश अभिनेत्रीशी युवराजची लग्नगाठ, या महिन्यात होणार 'रोका' विधी

 नुकत्याच विवाहबंधनात अडकलेल्या क्रिकेटर हरभजन सिंग याच्यानंतर आता लगेचच आणखी एक क्रिकेटर आपला नंबर लावतोय... तो दुसरा तिसरा कुणीही नाही तर ज्याच्यासाठी तरुणी घायाळ होतात तो इंडियाज मोस्ट एलिजिबल बॅचलर युवराज सिंह आहे. या महिन्यात पंजाबी समाजातील 'रोका' हा विधी होण्याची शक्यता आहे, अजून तारीख निश्चि झालेली नाही. 

Updated: Nov 4, 2015, 09:07 PM IST
ब्रिटीश अभिनेत्रीशी युवराजची लग्नगाठ, या महिन्यात होणार 'रोका' विधी title=

मुंबई :  नुकत्याच विवाहबंधनात अडकलेल्या क्रिकेटर हरभजन सिंग याच्यानंतर आता लगेचच आणखी एक क्रिकेटर आपला नंबर लावतोय... तो दुसरा तिसरा कुणीही नाही तर ज्याच्यासाठी तरुणी घायाळ होतात तो इंडियाज मोस्ट एलिजिबल बॅचलर युवराज सिंह आहे. या महिन्यात पंजाबी समाजातील 'रोका' हा विधी होण्याची शक्यता आहे, अजून तारीख निश्चि झालेली नाही. 

होय, युवी लवकरच म्हणजे येत्या फेब्रुवारी महिन्यात अभिनेत्री हेझल किच हिच्यासोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. एका स्पोर्टस वेबसाईटमध्ये देण्यात आलेल्या बातमीनुसार, त्याच्या नातेवाईकांनीच ही गोष्ट उघड केलीय. 

इतकंच नाही तर युवीच्या लग्नाची तारीखही पक्की झालीय... आणि यासाठी तयारीही सुरू झालीय. हरभजनच्या लग्नाबद्दल त्याला शुभेच्छा देताना युवीनं आपल्या लग्नाची एक हिंटही दिलीय.

काही दिवसांपूर्वीच युवराज आणि हेझल विमानतळावर एकत्र दिसले होते. हे दोघे गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

अधिक वाचा - कोण आहे हेझल किच... 

युवराज सिंहचं लग्न फतेहगडच्या हंसालीवाला गुरुद्वारामध्ये पारंपरिक पद्धतीनं पार पडेल. त्यानंतर आपल्या मित्रांना युवी चंदीगडमध्ये एक पार्टी देणार आहे. तर नातेवाईकांसाठी आणि मित्रांसाठी दिल्लीतही रिसेप्शन पार पडेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.