आयपीएल 2015: कॅप्टन कूल धोनीला बसलाय दंड

आयपीएलच्या आठव्या सिझनची पहिली क्वालिफायर मॅच मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध झाली. या मॅचमध्ये कॅप्टन कूल धोनीची चेन्नई टीम 25 रन्सनी पराभूत झाली. 

PTI | Updated: May 20, 2015, 12:35 PM IST
आयपीएल 2015: कॅप्टन कूल धोनीला बसलाय दंड title=

मुंबई: आयपीएलच्या आठव्या सिझनची पहिली क्वालिफायर मॅच मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध झाली. या मॅचमध्ये कॅप्टन कूल धोनीची चेन्नई टीम 25 रन्सनी पराभूत झाली. 

मॅच गमावण्यासोबतच धोनीला आणखी एक धक्का बसलाय. तो म्हणजे त्यानं अंपायरच्या निर्णयबाबत घेतलेला आक्षेप. अंपायरच्या निर्णयाला चुकीचं म्हणत धोनीनं कमेंट केली. त्यामुळं आता धोनीला मॅच फीच्या 10 टक्के दंड भरावा लागलाय.

मंगळवारी झालेल्या मॅचदरम्यान धोनीनं आपल्या टीमचा बॅट्समन ड्वेन स्मिथच्या आऊट होण्याच्या अंपायरच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला होता. मुंबई इंडियन्सकडून 25 रन्सनी पराभूत झाल्यानंतर धोनीनं स्मिथला आऊट देण्याचा निर्णय चुकीचा होता, असं वक्तव्य केलं होतं. 

धोनी म्हणाला, 'आमची मॅचमध्ये लय बिघडली आणि स्मिथही चुकीच्या निर्णयानं आऊट झाला, म्हणून आम्ही मॅच गमावली'. स्मिथला मलिंगानं पहिल्याच ओव्हरमध्ये एलबीडब्लू  आऊट केलं होतं. बॉल त्याच्या पॅडवर लागली होती. पण रिप्लेमध्ये बॉल लेग साइडच्या बाहेर जातांना दिसत होती. 

धोनीनं आपल्या चुकीचा दंड भरलेला आहे. चेन्नई टीम शुक्रवारी रांचीमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध आपली दुसरी क्वालिफायर मॅच खेळणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.