रोहित शर्मा- डॅरेन ब्राव्हो मैदानात भिडले

रोहित शर्मा आणि डॅरेन ब्राव्हो यांच्या मानधनातील 15 टक्के रक्कम कापायचा निर्णय आयसीसीनं घेतला आहे.

Updated: Aug 14, 2016, 08:24 PM IST
रोहित शर्मा- डॅरेन ब्राव्हो मैदानात भिडले  title=

सेंट लुशिया : रोहित शर्मा आणि डॅरेन ब्राव्हो यांच्या मानधनातील 15 टक्के रक्कम कापायचा निर्णय आयसीसीनं घेतला आहे. तिसऱ्या टेस्टच्या शेवटच्या दिवशी रोहित शर्मा आणि डॅरेन ब्राव्होमध्ये बाचाबाची झाली. यावेळी डॅरेन ब्राव्होनं रोहितला धक्काही मारला. मॅच संपल्यानंतर या दोन्ही खेळाडूंनी त्यांना केलेली शिक्षा मान्य केली. 

पाहा रोहित शर्मा- डॅरेन ब्राव्होमधल्या बाचाबाचीचा व्हिडिओ