सचिनला या बॉलरचा सामना करतांना वाटायची भीती

जगात असे अनेक बॉलर आहेत ज्यांनी सचिन समोर कधी बॉलिंग करणं पसंद केलं नसेल. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर समोर अनेक बॉलर्स बॉलिंग करताना घाबरायचे. पण सचिनने असा खुलासा केला आहे की त्याला देखील एका बॉलरसमोर खेळायला भीती वाटायची.

Updated: May 19, 2017, 11:54 AM IST
सचिनला या बॉलरचा सामना करतांना वाटायची भीती title=

मुंबई : जगात असे अनेक बॉलर आहेत ज्यांनी सचिन समोर कधी बॉलिंग करणं पसंद केलं नसेल. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर समोर अनेक बॉलर्स बॉलिंग करताना घाबरायचे. पण सचिनने असा खुलासा केला आहे की त्याला देखील एका बॉलरसमोर खेळायला भीती वाटायची.

तेंडुलकरने म्हटलं की, तो दक्षिण आफ्रिेकेचा माजी कर्णधार हंसी क्रोनी याला खूप घाबरायचा. त्याच्या बॉलिंगसमोर त्याला बॅटींग करणं पसंत नव्हतं. 1989 मध्ये जेव्हापासून मी क्रिकेट खेळणं सुरु केलं तेव्हा पासून जवळपास २५ चांगल्या बॉलर्सचा सामना केला पण हंसीच्या बॉलिंगचा सामना करणं मला पंसद नव्हतं. त्याच्या बॉलिंगवर मी अनेकदा आऊट व्हायचो. म्हणून मग मी विचार करायचो की नॉन स्ट्राईकवरच राहुन त्याची बॉलिंग पाहावी.

हंसीच्या बॉलिंगच्या वेळेस मी सोबतच्या खेळाडूला म्हणायचो की, मी एलन डोनाल्ड आणि शॉन पॉलकच्या बॉलचा सामना करेल पण हंसीच्या बॉलिंगचा तुच सामना कर. सचिनने 1999 मध्ये ऑस्ट्रेलिया सोबतची सिरीज ही अधिक कठिण असल्याचं त्याने म्हटलं आहे. 1999 मध्ये आम्ही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेले होतो. त्यावेळेस ऑस्ट्रेलियाची टीम सगळ्यात मजबूत होती. त्या टीममधल्या खेळाडूंमुळे ऑस्ट्रेलियाने अनेक वर्ल्डकप जिंकले.'