क्रिकेटच्या मैदानात क्रिकेटपटूचा मृत्यू, सचिनला धक्का

सचिन तेंडुलकरनं तरुण क्रिकेटपटू अंकित केसरीच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केलंय. १७ एप्रिलला बंगाल क्रिकेट संघाच्या सीनिअर वनडे नॉकआऊट मॅचदरम्यान मैदानात सहखेळाडूला धडकल्यानंतर अंकितचा मृत्यू झाला. 

PTI | Updated: Apr 20, 2015, 07:06 PM IST
क्रिकेटच्या मैदानात क्रिकेटपटूचा मृत्यू, सचिनला धक्का  title=

नवी दिल्ली: सचिन तेंडुलकरनं तरुण क्रिकेटपटू अंकित केसरीच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केलंय. १७ एप्रिलला बंगाल क्रिकेट संघाच्या सीनिअर वनडे नॉकआऊट मॅचदरम्यान मैदानात सहखेळाडूला धडकल्यानंतर अंकितचा मृत्यू झाला. 

सचिननं आपल्या फेसबुक पेजवर लिहिलं, 'अंकित केसरीच्या मृत्यूनं मी खूप दु:खी आहे. मैदानात अशी दुर्दैवी घटना घडली आणि एक हुशार क्रिकेटपटूच्या करिअरचा दुखद अंत झाला. ईश्वर त्याच्या कुटुंबियांना आणि मित्रांना या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो.'

केसरी गेल्या तीन दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये भर्ती होता. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत होती. मात्र आज सकाळी त्याला हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलं गेलं. नंतर मात्र त्याला मृत घोषित केलं गेलं. 

हा २० वर्षीय तरुण बॅट्समन बेहार ट्रॉफीमध्ये बंगालच्या अंडर १९ टीममध्ये होता आणि तो २०१४च्या अंडर-१९ वर्ल्ड कपसाठी भारताच्या ३० सदस्यीय टीममध्ये सहभागी होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.