मुंबई : मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडुलकरने आपल्या जीवनावर तयार केल्या जाणाऱ्या डॉक्युमेंट्रीसाठी फॅन्सकडून नावं मागवली आहेत.
सचिने ट्वीट केलंय, मला गर्व आहे की, माझ्या जीवनावर एक डॉक्युमेंट्री तयार होत आहे, @ravi0404 आणि @200NOTOUTFIILMS सोबत ही बनवली जात आहे.
"माझी अशी इच्छा आहे की, आपण यात सामिल व्हायला हवं, या डॉक्युमेंट्रीला मी काय नावं देऊ, यासाठी तुम्ही मला सल्ला द्या, तुमचे विचार मला पाठवा'
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या १६ वर्षाच्या वयाता क्रिकेट करिअरला सुरूवात केली होती.
जो उत्कृष्ट नाव सुचवेल, त्याला एक खास मेजवानी देण्याचं वचनही सचिन तेंडुलकरने दिलंय. सचिन तेंडुलकर या डॉक्युमेंट्रीत काम करणार आहे, मुंबईची प्रॉडक्शन कंपनी २०० नॉट आऊट आणि वर्ल्ड स्पोर्टस ग्रुपने ही कल्पना मांडली आहे.
चित्रपटाचं निर्देशन लंडनचे लेखक दिग्दर्शक जेम्स अर्सकिन करणार आहेत, त्यांनी दावा केला आहे की, मी कोणत्याही प्रख्यात व्यक्तीबद्दल एवढं फुटेज आणि एवढ्या बाजू बघितलेल्या नाहीत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.