मुंबई: क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आपल्याला आता गातांना दिसणार आहे. सचिननं नुकतंच स्वच्छ भारत अभियानाचं अँथम रेकॉर्ड केलं. सचिन आज ट्विटरवरून ही माहिती दिलीय. स्वच्छ भारत अभियानासाठी आपली आणखी एक मदत असल्याचं त्यानं सांगितलं.
आणखी वाचा - जेव्हा सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी मास्टर ब्लास्टरसाठी बॉलिंग केली
प्रसिद्ध संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांनी संगीतबद्ध केलेलं हे अँथम आहे. 2 ऑक्टोबरला हे अँथम रिलीज होणार आहे. शंकर महादेवन यांच्यासोबत सचिननंही हे गायलंय.
Lending my voice, support and more to a #SwachhBharat. With @Shankar_Live, @Prasoon_Joshi, @SuPriyoBabul pic.twitter.com/h2NBOtkU3K
— sachin tendulkar (@sachin_rt) September 28, 2015
या अँथममध्ये अनेक सेलिब्रिटीज एकत्र येऊन देशातील जनतेला स्वच्छतेचं आवाहन करणार आहे. हे अँथम साँग गीतकार प्रसून जोशी यांनी लिहिलंय. मुकेश भट्ट यांनी अँथमच्या व्हिडिओची निर्मिती केलीय.
सचिननं या अँथममध्ये काही ओळी गायल्या आहेत. तसंच काही सूचनाही रेकॉर्डिंग दरम्यान दिल्या. अँथमचं ऑडिओ साँग महात्मा गांधींची जयंती म्हणजेच येत्या 2 ऑक्टोबरला रिलीज होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा - माझ्यासाठी देवासारखा आहे सचिन तेंडुलकर - धोनी
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.