नवी दिल्ली : तुम्हाला हे माहितीच असेल की सचिन तेंडुलकर भारताकडून त्याचा पहिला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना १०८९ मध्ये खेळला होता... पण, सचिननं त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात भारताच्या विरुद्ध खेळून केली होती... आणि यावेळी तो पाकिस्तानकडून खेळला होता... हे मात्र फारच कमी लोकांना माहीत नसेल.
अशक्य वाटणारी ही गोष्ट घडलीय खरी... १९८७ साली सचिन मैदानावर बदली खेळाडू म्हणून उतरला होता. यावेळी, भारत विरुद्ध पाकिस्तान अशी मॅच मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये सुरु होती.
दुपारच्या जेवणाच्या वेळी पाकिस्तानी खेळाडू जावेद मियाँदाद आणि अब्दुल कादिर मैदान सोडून बाहेर गेले होते तेव्हा १३ वर्षीय सचिनला मैदानावर उतरण्यासाठी विचारणा करण्यात आली होता. पाकिस्तानी स्किपर इमरान खान यानं सचिनला फिल्डिंग करण्यासाठी सांगितलं होतं.
यावेळी, कपिल देव बॅटींग करत होता. त्यानं एक जोरदार शॉट लगावला. तेंडुलकरनं हा कॅच पकडण्याचा पुरेपूर प्रयत्नही केला. परंतु, जवळपास १५ मिटर धावूनही सचिन ही कॅच पकडण्यात अयशस्वी ठरला होता.
हा किस्सा ४१ वर्षीय सचिननंच ‘प्लेईंग इट माय वे’ या आपल्या आत्मचरित्रात कथन केलाय. पण, या मॅचमुळे त्याचा ‘पहिला कॅप्टन’ ठरलेल्या इमरान खानला ही गोष्ट लक्षात आहे किंवा नाही, याबद्दल मात्र सचिन साशंक आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.