सेमीफायनलमध्ये कुणीही जिंको, फायनलमध्ये खेळणार सचिन!

आपण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे फॅन आहात आणि २०१५ वर्ल्डकपमध्ये त्याला खेळतांना बघू इच्छितात. तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये कुणीही जिंको, फायनलमध्ये पोहोचणाऱ्या टीमसोबत सचिन तेंडुलकर असेलच!

Updated: Mar 23, 2015, 08:04 PM IST
सेमीफायनलमध्ये कुणीही जिंको, फायनलमध्ये खेळणार सचिन! title=

मुंबई: आपण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे फॅन आहात आणि २०१५ वर्ल्डकपमध्ये त्याला खेळतांना बघू इच्छितात. तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये कुणीही जिंको, फायनलमध्ये पोहोचणाऱ्या टीमसोबत सचिन तेंडुलकर असेलच!

सध्या व्हॉट्स अॅपवर एक मॅसेज फिरतोय. हा फोटो निट पाहा.. यानुसार वर्ल्डकप सेमीफायनलच्या चारही टीममध्ये सचिन तेंडुलकर आपल्याला दिसेल.

सचिनच्या फॅन्सनी सेमीफायनलमधील सर्व खेळाडूंच्या नावाची अशी काही सेटिंग केलीय, की प्रत्येक टीममध्ये एक कॉमन नाव सचिन तेंडुलकर येतंय.

क्रिकेटच्या या महान खेळाडूला इंटरनॅशनल क्रिकेट असोसिएशन (आयसीसी) नं वर्ल्डकप २०१५चा ब्रँड अम्बेसिडेर म्हणून नियुक्त केलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.