वा! वा!आपल्या बायोपिकमध्ये अॅक्टिंग करणार सचिन!

महेंद्र सिंह धोनीनंतर आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जीवनावरही चित्रपट येतोय. सचिनवर तयार होणारा हा चित्रपट देशभरातील २००० चित्रपट गृहांमध्ये रिलीज करण्याचा प्लान आहे. मात्र  चित्रपट रिलीजची डेट अजून जाहीर झालेली नाहीय.

Updated: Jan 8, 2015, 03:19 PM IST
वा! वा!आपल्या बायोपिकमध्ये अॅक्टिंग करणार सचिन!

मुंबई: महेंद्र सिंह धोनीनंतर आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जीवनावरही चित्रपट येतोय. सचिनवर तयार होणारा हा चित्रपट देशभरातील २००० चित्रपट गृहांमध्ये रिलीज करण्याचा प्लान आहे. मात्र  चित्रपट रिलीजची डेट अजून जाहीर झालेली नाहीय.

चित्रपटातील सर्वात खास गोष्ट म्हणजे स्वत: सचिन तेंडुलकरसुद्धा चित्रपटात अॅक्टिंग करणार आहे. मुंबईतील एक प्रॉडक्शन कंपनी '२०० नॉट आऊट'च चित्रपटाची निर्मिती करतेय.

'२०० नॉट आऊट' कंपनीनं १५० पेक्षा जास्त जाहिराती आणि शॉर्ट फिल्म बनवल्या आहेत. कंपनीनं आपल्या जुन्या कामाच्या आधारावर वर्ल्ड स्पोर्ट्स ग्रुपकडून सचिनवर चित्रपट बनविण्याचे अधिकार विकत घेतले आहे. वर्ल्ड स्पोर्ट्स ग्रुप सचिनचं ब्रँड मॅनेजमेंट आणि कमर्शिअल काम पाहते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.