ऑस्ट्रेलियात 500 टेस्ट रन्स ठोकणारा दुसरा भारतीय क्रिकेटर...

कॅप्टन विराट कोहली गुरुवारी चौथ्या आणि शेवटच्या मॅच दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट साखळीत 500 हून अधिक रन बनवणारा दुसरा भारतीय बॅटसमन ठरलाय.

Updated: Jan 8, 2015, 01:48 PM IST
ऑस्ट्रेलियात 500 टेस्ट रन्स ठोकणारा दुसरा भारतीय क्रिकेटर...

सिडनी : कॅप्टन विराट कोहली गुरुवारी चौथ्या आणि शेवटच्या मॅच दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट साखळीत 500 हून अधिक रन बनवणारा दुसरा भारतीय बॅटसमन ठरलाय.

सीरिजमधल्या मागच्या तीन मॅचमध्ये 499 रन्स बनवणाऱ्या कोहलीनं सकाळच्या सत्रात 44 व्या ओव्हरमध्ये ऑफ स्पिनर नाथन लिओनवर फोर ठोकून ही उपलब्धि मिळवलीय. 

आपल्या करिअरमधली 33 वी टेस्ट आणि सीरिजमध्ये सातव्यांदा खेळणाऱ्या 26 वर्षीय कोहलीच्या अगोदर बॅटसमन राहुल द्रविडनं 2003-04 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आठ भागांत 619 रन्स बनवले.

वर्ष 2011 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या टेस्टमध्ये पदार्पण करणाऱ्या कोहलीनं पहिल्याच सीरिजमध्ये याअगोदरच तीन शतकं ठोकलीत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.