सचिननं काढली ब्रेट लीची पिसं

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर ब्रेट ली यांच्यामधली जुगलबंदी नेहमीच पाहण्यासारखी असायची. 

Updated: Mar 11, 2016, 03:39 PM IST
सचिननं काढली ब्रेट लीची पिसं title=

मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर ब्रेट ली यांच्यामधली जुगलबंदी नेहमीच पाहण्यासारखी असायची. 2008 साली ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवरही या दोघांमध्ये अशीच जुगलबंदी रंगली होती. 

या सामन्यामध्ये ब्रेट ली 150 किमीच्या वेगानं बॉलिंग करत होता. सचिननं एवढ्या वेगानं येणाऱ्या बॉलचा खरपूस समाचार घेतला. सचिननं ब्रेट ली च्या पहिल्या दोन बॉलमध्ये सचिननं फोर मारल्या, तिसऱ्या बॉलवर रन बनली नाही, पण चौथ्या बॉलवर सचिननं पुन्हा फोर मारली, आणि ब्रेट लीची लाईन आणि लेन्थच बिघडवून टाकली.

पाहा सचिनची फटकेबाजी