दक्षिण आफ्रिकेच्या जखमांची कथा, आपल्यालाही रडवेल

वर्ल्डकप २०१५च्या पहिल्या सेमीफायनलच्या रोमांचक मॅचमध्ये न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून पहिल्यांदा वर्ल्डकपची फायनल गाठलीय. मात्र मोठ्या मॅचमध्ये द. आफ्रिकेच्या पराभवानंतर कसं नशीब दक्षिण आफ्रिकेच्या टीमवर रागावलंय हे दिसतंय.

Updated: Mar 25, 2015, 03:04 PM IST
दक्षिण आफ्रिकेच्या जखमांची कथा, आपल्यालाही रडवेल title=

नवी दिल्ली : वर्ल्डकप २०१५च्या पहिल्या सेमीफायनलच्या रोमांचक मॅचमध्ये न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून पहिल्यांदा वर्ल्डकपची फायनल गाठलीय. मात्र मोठ्या मॅचमध्ये द. आफ्रिकेच्या पराभवानंतर कसं नशीब दक्षिण आफ्रिकेच्या टीमवर रागावलंय हे दिसतंय.

२०१५च्या पहिल्या सेमीफायनलमध्येही दक्षिण आफ्रिकेचा खेळ पावसामुळं खराब झाला. १९९२च्या वर्ल्डकप सेमीफायनलची ती मॅच सर्वांनाच आठवत असेल, तेव्हाही पावसामुळं दक्षिण आफ्रिका टीमचा पराभव झाला होता.

दक्षिण आफ्रिकेच्या टीमनं पहिले बॅटिंग करून दमदार रन्स केले होते. मात्र पावसामुळं खेळ थांबवावा लागला आणि मॅच ५० ओव्हरची न होता ४३ ओव्हरची मॅच झाली. दक्षिण आफ्रिकेच्या टीमनं चार विकेट गमावून २८१ रन्स केले. मात्र ज्या पद्धतीनं टीम खेळत होती, त्याप्रमाणे खूप मोठं आव्हान त्यांनी न्यूझीलंडसमोर ठेवलं असतं. पण दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाचं कारण पाऊसाबरोबरच सुटलेला तो एक कॅच आणि ढिसाळ क्षेत्ररक्षणही आहे.

मात्र दक्षिण आफ्रिकेनं इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे.  

1992च्या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा सामना इंग्लंड विरुद्ध होता. सामन्याच्या शेवटच्या क्षणी दक्षिण आफ्रिकेला 13 चेंडूत 22 धावांची गरज असतांना पावसाने हजेरी लावली. जेव्हा खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा दक्षिण आफ्रिकेला अवघ्या एका चेंडूत 22 धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. आणि अशा तऱ्हेने दक्षिण आफ्रिका वर्ल्ड कपमधून बाहेर झाली.

1999च्या वर्ल्ड कपमध्ये आफ्रिकेची टीम पुन्हा सेमीफायनलमध्ये पोहचली. यावेळी सामना होता ऑस्ट्रेलिया विरुद्ध. तो सामना अनिर्णित राहिला. मात्र पहिल्या फेरीत ऑस्ट्रेलियाकडून दक्षिण आफ्रिका पराभूत झाली असल्याने दक्षिण आफ्रिका वर्ल्डकपमधून बाहेर झाली.

1996च्या वर्ल्डकपमध्ये आफ्रिकेची टीम क्वार्टर फायनलमधूनच बाहेर झाली होती. 
2003चा वर्ल्डकप दक्षिण आफ्रिकेतच होता. मात्र त्यावेळी टीमला पहिल्या फेरीतूनच बाहेर जावे लागले होते. त्याला कारणही पाऊसच ठरला होता.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.