जकार्ता : माजी वर्ल्ड नंबर वन भारताची 'फुल'राणी सायना नेहवालला वर्ल्ड चॅम्पियन्सशीपच्या फायनलमध्ये स्पेनच्या कॅरॉलिना मरिनने नमवले. सायनाने सिल्व्हर मेडल जिंकून इतिहासाच्या पानामध्ये आपले नाव कोरले आहे. भारताकडून वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये सिल्व्हर पदक जिंकणारी ती पहिली भारतीय आहे.
सायनाला हा किताब जिंकण्यात अपयश आले असले तरी तीने एक नविन विक्रम प्रस्थापित केला आहे. यापूर्वी कोणत्याही भारतीयाने या स्पर्धेत ब्रॉन्झ मेडलपेक्षा चांगली कामगिरी केली नव्हती.
सामन्याच्या सुरूवातीला सर्वांना वाटले होते की सायना जिंकणार आणि मरिनला ऑल इंग्लड बॅडमिंटन चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये हरविल्याचा बदला घेईल. पण कोट्यवधी भारतीयांचा भ्रमनिरास होऊन सायना २१-१६, २१-१९ अशी सरळ गेममध्ये पराभूत झाली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.