'फुलराणी'चं सुवर्ण स्वप्न भंगलं, स्पेनच्या कॅरोलिनाकडून पराभूत

ऑल इंग्लंड बॅडमिंट स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याचं सायना नेहवालचं स्वप्न अर्धवटच राहिलं. आज झालेल्या फायनलमध्ये स्पेनच्या कॅरोलिन मरिननं सायनाचा १६-२१, २१-१४, २१-७ असा पराभव केला. स्पेनच्या महिला खेळाडूनं ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावण्याची ही पहिलीच वेळ आहे.  

Updated: Mar 8, 2015, 08:20 PM IST
'फुलराणी'चं सुवर्ण स्वप्न भंगलं, स्पेनच्या कॅरोलिनाकडून पराभूत title=

बर्मिंघम: ऑल इंग्लंड बॅडमिंट स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याचं सायना नेहवालचं स्वप्न अर्धवटच राहिलं. आज झालेल्या फायनलमध्ये स्पेनच्या कॅरोलिन मरिननं सायनाचा १६-२१, २१-१४, २१-७ असा पराभव केला. स्पेनच्या महिला खेळाडूनं ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावण्याची ही पहिलीच वेळ आहे.  

भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं ऑल इंग्लंडस्पर्धेच्या फायनलमध्ये धडक देत विक्रम रचला होता. या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचणारी सायना ही पहिलीच भारतीय महिला बॅडमिंटनपटू आहे. रविवारी या स्पर्धेची अंतिम लढत रंगली. 

सायनासमोर आव्हान होतं ते स्पेनच्या २१ वर्षीय कॅरोलिन मरिनचं. सायनानं पहिला २१-१६ नं जिंकून आघाडी घेतली. मात्र यानंतर मरिननं लागोपाठ दोन सेट जिंकत सायनाचा पराभव केला. ६२ मिनीटं हा सामना रंगला होता. मरिन पहिल्यांदाच या स्पर्धेत उतरली होती आणि पदार्पणातच तिनं स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.