क्वालालंपूर : वर्ल्ड नंबर वन बॅडमिंटन प्लेअर सायना नेहवालने मलेशियन ओपनच्या सेमी फायनमलध्ये धडक मारलीय. क्वार्टर फायनलमध्ये सायनाने चीनच्या सन यूला 21-11, 18-21, 21-17ने पराभूत करत सेमी फायनल गाठली.
आता सेमी फायनलमध्ये सायनाचा मुकाबला चीनच्या ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट ली झुरुई हिच्याशी होईल. सायनाच्या करियरमधील मेलशियन ओपनमधील ही तिसरी सेमी फायनल असेल. दरम्यान क्वार्टर फायनलमध्ये अनसीडेड सन यूनं सायनाला सहज विजय मिळवू दिला नाही.
सायानाने पहिला गेम सहज जिंकला. मात्र दुसरा गेम सन यूनं जिंकला. यानंतर तिसरा गेम अटीतटीचा झाला अखेर सायानाने 21-17नं गेम जिंकत ती विजयी ठरली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.