सायना नेहवालची ऑल इंग्लंड ओपन फायनलमध्ये धडक

भारताची अव्वल बॅडमिंटन प्लेअर सायना नेहवालने ऑल इंग्लंड ओपनच्या फायनलमध्ये धडक मारत इतिहास रचला आहे. ऑल इंग्लंड ओपनच्या फायनलमध्ये धडक मारणारी ती पहिली भारतीय महिला बॅडमिंटन प्लेअर ठरलीय.

PTI | Updated: Mar 7, 2015, 08:14 PM IST
सायना नेहवालची ऑल इंग्लंड ओपन फायनलमध्ये धडक  title=

लंडन : भारताची अव्वल बॅडमिंटन प्लेअर सायना नेहवालने ऑल इंग्लंड ओपनच्या फायनलमध्ये धडक मारत इतिहास रचला आहे. ऑल इंग्लंड ओपनच्या फायनलमध्ये धडक मारणारी ती पहिली भारतीय महिला बॅडमिंटन प्लेअर ठरलीय.

सेमी फायनलमध्ये तिस-या सीडेड सायनाने चीनच्या अनसीडेड सू यूला 21-13, 21-13 असं पराभूत करत फायनलमध्ये धडक मारली. यापूर्वी पुलेला गोपीचंद आणि प्रकाश पदुकोण यांनी ऑल इंग्लंड ओपनच्या फायनलमध्ये धडक मारली होती. 

याआधी 2010 मध्ये सायनाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. पण त्यावेळी चिनच्या यिहान वँगकडून तिला पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, चीनने अनेक तगडे खेळाडू सेमीफायनलआधीच बाद झाले आहेत. त्यामुळे सायना नेहवालला ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकण्याची संधी आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.