सायनाची मलेशिया मास्टर्सच्या सेमीफायनलमध्ये धडक

माजी वर्ल्ड नंबर वन भारताची सायना नेहवालने मलेशिया मास्टर्समध्ये महिला एकेरीच्या सेमीफायनलमध्ये धडक मारलीये. 

Updated: Jan 21, 2017, 08:10 AM IST
सायनाची मलेशिया मास्टर्सच्या सेमीफायनलमध्ये धडक title=

सारावक(मलेशिया) : माजी वर्ल्ड नंबर वन भारताची सायना नेहवालने मलेशिया मास्टर्समध्ये महिला एकेरीच्या सेमीफायनलमध्ये धडक मारलीये. 

लंडन ऑलिम्पिक कांस्यपदकविजेती सायना नेहवालने क्वार्टरफायनलमध्ये इंडोनेशियाच्या फितरानी फितरानीला २१-१५, २१-१४ असं ४० मिनिटांच्या खेळात हरवलं. 

सायनाने सेमीफायनलमध्ये धडक मारली असली तरी पुरुष एकेरीत मात्र भारताच्या अजय जयरामचे आव्हान संपुष्टात आलंय. त्याला इंडोनेशियाच्या अँथनी सिनुस्काकडून पराभवाचा धक्का बसला.