सॅम्युअल बद्रीनं घेतली यंदाच्या मोसमातली पहिलीच हॅट्रिक

सॅम्युअल बद्रीनं यंदाच्या आयपीएल मोसमातली पहिलीच हॅट्रिक घेतली आहे. आयपीएलच्या दहा मोसमातली ही पंधरावी हॅट्रिक आहे. मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये बद्रीनं पहिले पार्थिव पटेल मग मिचेल मॅकलेनघन आणि रोहित शर्माची विकेट घेतली. बद्रीच्या या हॅट्रिकमुळे मुंबईची अवस्था ४ बाद ७ रन्स एवढी झाली होती. बद्रीनं ४ ओव्हरमध्ये ९ रन्स देऊन ४ विकेट घेतल्या.

Updated: Apr 14, 2017, 08:10 PM IST
सॅम्युअल बद्रीनं घेतली यंदाच्या मोसमातली पहिलीच हॅट्रिक  title=

बंगळुरू : सॅम्युअल बद्रीनं यंदाच्या आयपीएल मोसमातली पहिलीच हॅट्रिक घेतली आहे. आयपीएलच्या दहा मोसमातली ही पंधरावी हॅट्रिक आहे. मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये बद्रीनं पहिले पार्थिव पटेल मग मिचेल मॅकलेनघन आणि रोहित शर्माची विकेट घेतली. बद्रीच्या या हॅट्रिकमुळे मुंबईची अवस्था ४ बाद ७ रन्स एवढी झाली होती. बद्रीनं ४ ओव्हरमध्ये ९ रन्स देऊन ४ विकेट घेतल्या.

बद्रीच्या या दमदार कामगिरीनंतरही मुंबईनं आरसीबीचा ४ विकेटनं पराभव केला. कायरन पोलार्डनं ४७ बॉलमध्ये ७० रन्स आणि कृणाल पांड्यानं ३० बॉलमध्ये ३७ रन्स केल्या. चार पैकी तीन मॅच जिंकल्यामुळे मुंबई इंडियन्स पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. मुंबईकडे सध्या सहा पॉईंट्स आहेत.

पाहा बद्रीची हॅट्रिक