संगकारा सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड तोडण्याच्या तयारीत

वर्ल्डकप २०१५मध्ये अनेक विक्रम प्रत्येक जण आपल्या नावावर करीत आहेत. आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे विक्रम मोडीत काढण्यासाठी श्रीलंकेचा कुमार संगकारा तयारीत आहे.

PTI | Updated: Mar 17, 2015, 01:55 PM IST
संगकारा सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड तोडण्याच्या तयारीत title=

मेलबर्न : वर्ल्डकप २०१५मध्ये अनेक विक्रम प्रत्येक जण आपल्या नावावर करीत आहेत. आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे विक्रम मोडीत काढण्यासाठी श्रीलंकेचा कुमार संगकारा तयारीत आहे.

कुमार संगकारा या वर्ल्डकपमध्ये कमालीचा फॉर्ममध्ये आहे. प्रत्येक सामन्यागणिक संगकारा नव-नवे रेकॉर्ड नोंदवत आहे. आतापर्यंत त्याने सलग चार सामन्यांमध्ये शतकी खेळी केली आहे. 

विश्वचषकात सर्वात जास्त शतकं आणि एकाच विश्वचषकात सर्वात जास्त रन्स, असे दोन रेकॉर्ड्स सध्या सचिनच्या नावावर आहेत. मात्र संगकाराची यंदाच्या विश्वचषकातील फॉर्म पाहता तो सचिनचे रेकॉर्ड तोडण्याची शक्यता आहे.

आता श्रीलंका उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली असून त्यांचा सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. २००३3 मध्ये झालेल्या विश्वचषकातील ११ सामन्यांमध्ये सचिनने ६७३ रन्स केल्या होत्या. आतापर्यंतच्याकोणत्याच खेळाडूने एवढ्या रन्स केलेल्या नाहीत. 

कुमार संगकाराने ६ सामन्यांमध्ये ४९६ रन्सवर मजल मारली आहे. शिवाय या विश्वचषकातील सर्वात जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो अव्वल स्थानावर आहे. त्याच्या या ४९६ रन्समध्ये चार शतकांचाही समावेश आहे. सचिन तेंडुलकरने दोन वेळा वर्ल्डकपमध्ये ५०० रन्सचा टप्पा गाठला आहे आणि एवढ्या धावा करणारा तो क्रिकेट जगतातील एकमेव खेळाडू आहे.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.