मयप्पन-राज कुंद्रा सट्टेबाजी प्रकरणात दोषी - सुप्रीम कोर्ट

आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीप्रकरणी सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. श्रीनिवासन यांचे जावई आणि चेन्नई सुपर किंगजचे अधिकारी गुरुनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्सचे को-ओनर राज कुंद्रा हे स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दोषी असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलाय. 

Updated: Jan 23, 2015, 06:52 AM IST
मयप्पन-राज कुंद्रा सट्टेबाजी प्रकरणात दोषी - सुप्रीम कोर्ट title=

नवी दिल्ली : आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीप्रकरणी सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. श्रीनिवासन यांचे जावई आणि चेन्नई सुपर किंगजचे अधिकारी गुरुनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्सचे को-ओनर राज कुंद्रा हे स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दोषी असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलाय. 

आयपीएलमधून महेंद्रसिंह धोनीची टीम चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही टीम्सवर बंदी घालण्यात आलीय. या दोन्ही टीम दोषी असल्यानं सुप्रीम कोर्टानं दोन्ही टीम्सवर बंदी घातलीय. 

 याचबरोबर एन. श्रीनिवासन यांना बीसीसीआयचे अध्यक्ष किंवा चेन्नई सुपर किंग्जचे मालक अशा दोन्ही जबाबदाऱ्या ते एकाचवेळी सांभाळू शकणार नाहीत, असा निर्णयही कोर्टाने दिल्याने श्रीनिवासन यांना मोठा दणका बसलाय. याचबरोबर श्रीनिवासन हे बीसीसीआयची निवडणूक लढू शकणार नसल्याचाही निकाल कोर्टाने दिलाय. 
 
दरम्यान फिक्सिंग प्रकरण दाबल्याचा कोणताही त्यांच्याविरोधात नसल्याने त्याप्रकरणात त्यांना क्लिन चिट देण्यात आलीय. याचबरोबर बीसीसीआय ही खाजगी संस्था नसून तिचं कामकाज हे न्यायालयीन समीक्षेच्या कक्षेत येत असल्याचंही कोर्टाने स्पष्ट केलं. 
 
 परंतु, यावेळी कोणत्याही खेळाडूबाबत कोर्टाने काहीही निर्णय दिलेला नाही. याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने १३० पानांचा निकाल दिलाय. दोषींवर कारवाई करण्यासाठी बीसीसीआय समर्थ नसल्याचं सांगत कोर्टानं पाच जणांची समिती स्थापन केलीय. 
 
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरण... आत्तापर्यंत काय काय घडलं...  
१६ मे २०१३ - तीन प्लेअर्स फिक्सिंगप्रकरणी अटकेत
२१ मे २०१३ - विंदू दारा सिंग सट्टेबाजीप्रकरणी अटकेत
२१ मे २०१३ - मयप्पन पोलिसांच्या ताब्यात
२ जून २०१३ - बीसीसीआयनं याप्रकरणी चौकशी समिती नेमली
२८ जुलै  २०१३ - बीसीसीआय समितीने चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स टीमला क्लिन चिट 
३० जुलै  २०१३ - आदित्य वर्मा यांची कोर्टात याचिका
५ ऑगस्ट २०१३ - बीसीसीआयचं सुप्रीम कोर्टात अपील
१२ सप्टेंबर २०१३ - श्रीशांत, अंकितवर आजीवन बंदी
७ ऑक्टोबर २०१३ - सुप्रीम कोर्टाने मुदगल कमिटी नेमली
३ नोव्हेंबर २०१४ - मुदगल कमिटीचा अहवाल सुप्रीम कोर्टात

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.