लॉस एंजेलिस : 'फोर्ब्स'ने जगातील जास्त कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यात जगातील सर्वाधिक जास्त कमाई करणारी महिला खेळाडू टेनिसपटू सेरेना विलियम्स ठरली आहे.
पहिल्या १० श्रीमंत महिला खेळाडू
1) सेरेना विलियम्स - २८.९ दशलक्ष डॉलर्स
2) मारिया शारापोवा - २१.९ दशलक्ष डॉलर्स
3) रोंडा रौसी - १४ दशलक्ष डॉलर्स
4) डॅनिका पॅट्रीक्स - १३.९ दशलक्ष डॉलर्स
5) अॅग्निएझ्का रदवांस्का - १०.२ दशलक्ष डॉलर्स
6) कॅरोलीन वोझनियाकी - २८.९ दशलक्ष डॉलर्स
7) गरबाईन मुगुरुजा - ७.९ दशलक्ष डॉलर्स
8) अॅना इवानोविच - ७.९ दशलक्ष डॉलर्स
'फोर्ब्स' च्या सर्वेक्षणानुसार, सेरेना विलियम्सने गेल्या वर्षभरात सर्वाधिक २८.९ दशलक्ष डॉलर्सची कमार्इ केली आहे. तर गेली ११ वर्षे मारिया शारापोवा ही सर्वाधिक जास्त उत्पन्न मिळवणारी खेळाडू होती, परंतू यंदा सेरेना विलियम्सने तिला मागे टाकले आहे.
मारिया शारापोवाची यंदाच्या वर्षातील कमार्इ २१.९ दशलक्ष डॉलर्स आहे. नायके, पोर्श, टॅग हायर, अमेरिकन एक्सप्रेस अशा बड्या ब्रँडसाठी मारिया शारापोवा काम करत होती. पण वर्षाच्या सुरूवातीलाच तिच्यावर उत्तेजक द्रव्य सेवनाचा ठपका लागला. त्यामुळे काही प्रायोजक कंपन्यांनी तिच्यासोबत काम करण्यास तयार झाला नाहीत.