लाहोर: पाकिस्तानपेक्षा जास्त प्रेम आम्हाला भारतात मिळतं असं वक्तव्य पाकिस्तानचा कॅप्टन शाहिद आफ्रिदीनं केलं होतं. पण या वक्तव्यावरुन आफ्रिदी चांगलाच गोत्यात आला आहे.
या वक्तव्यामुळे शाहिद आफ्रिदीला पाकिस्तानच्या एका वकिलानं कायदेशिर नोटीस पाठवली आहे. आफ्रिदीनं केलेलं हे वक्तव्य पाकिस्तानविरोधी आहे, आणि त्यानं माफी मागावी अशी मागणी या नोटिसमध्ये करण्यात आली आहे.
दरम्यान शाहिद आफ्रिदीच्या या वक्तव्याचे पडसाद पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर उमटत आहेत. शाहिद आफ्रिदीनं भारतामध्येच रहावं अशा काही प्रतिक्रिया ट्विटरवर पाकिस्तानी नागरिकांनी दिल्या आहेत.