सानिया मिर्झाच्या पुस्तकाचे शाहरूखच्या हस्ते प्रकाशन

Updated: Jul 13, 2016, 03:00 PM IST
सानिया मिर्झाच्या पुस्तकाचे शाहरूखच्या हस्ते प्रकाशन title=
हैदराबाद : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्या 'एस अगेन्ट्स ऑड्स' या पुस्तकाचे प्रकाशन आज बॉलिवूड स्टार शाहरूख खानच्या हस्ते करण्यात येणार आहे. हे पुस्तक म्हणजे सानियाचे आत्मचरित्र आहे. या पुस्तकात सानियाने तिच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटनाक्रम शब्दबद्ध केला आहे. हे पुस्तक पूर्ण करण्यासाठी सानियाला 5 वर्षे लागली. 
 
तिच्या आयुष्याशी संबंधित वादांचाही या पुस्तकात उल्लेख करण्यात आला आहे. हार्पर कोलिंस प्रकाशित या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईत सलमान खानच्या हस्ते होईल.