मुंबई: ऑस्ट्रेलियाचा माजी लेग स्पिनर शेन वॉर्न यानं भारतीय संघाचा कोच व्हायची इच्छा व्यक्त केली आहे. बीसीसीआयकडून मला विचारणा झाली तर मी याचा नक्की विचार करीन असं शेन वॉर्न म्हणाला आहे.
क्रिकेटच्या बाबतीमध्ये मी आत्तापर्यंत कोणत्याच गोष्टीला नाही म्हणालो नाही, मला भारतीय संघाबरोबर काम करायला मिळालं तर आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया शेन वॉर्ननं दिली आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री हा सध्या टीमचा डायरेक्टर आहे. तोच भारतीय टीमच्या कोचची भूमिका बजावत आहे. पण आता रवी शास्त्रीनं मात्र हे पद सोडायचा निर्णय घेतल्याचं समजत आहे. त्यामुळे आता बीसीसीआयला भारतीय संघासाठी नवा कोच शोधावा लागणार आहे.