स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोन खेळाडूंवर निलंबनाची कारवाई

पाकिस्तानचे दोन क्रिकेटर खालिद लतीफ आणि शरजील खान यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं निलंबित केलंय. या दोघांनाही दुबईहून परत पाठवण्यात आलंय. 

Updated: Feb 11, 2017, 04:21 PM IST
स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोन खेळाडूंवर निलंबनाची कारवाई  title=

कराची : पाकिस्तानचे दोन क्रिकेटर खालिद लतीफ आणि शरजील खान यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं निलंबित केलंय. या दोघांनाही दुबईहून परत पाठवण्यात आलंय. 

खालिद आणि शरजील यांच्यावर पाकिस्तान सुपर लीगमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याचा आरोप आहे. 

पीसीबीनं दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे आता क्रिकेटच्या प्रत्येक फॉर्मेटमधून निलंबित राहतील. इंटरनॅशनल क्रिकेटर काऊन्सिल (आयसीसी) या प्रकरणाची पुढील चौकशी करेल. 

ओपनर बॅटसमन असलेला शरजील नुकताच न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियच्या दौऱ्यावर गेला होता. शरजील हा गेल्या वर्षी पीएसएल एलिमिनेटरमध्ये शतक ठोकणारा एकमेव खेळाडू ठरला होता.