सानियाचा नवरा काय बोलला भारताविषयी...

टी-20 वर्ल्ड कपमधल्या भारत आणि पाकिस्तानमधल्या महामुकाबल्याची क्रिकेट रसिक आतुरतेनं वाट पाहत आहेत.

Updated: Mar 13, 2016, 10:16 PM IST
सानियाचा नवरा काय बोलला भारताविषयी... title=

कोलकता: टी-20 वर्ल्ड कपमधल्या भारत आणि पाकिस्तानमधल्या महामुकाबल्याची क्रिकेट रसिक आतुरतेनं वाट पाहत आहेत. 19 मार्चला कोलकत्याच्या इडन गार्डनवर ही मॅच होणार आहे. या मॅचच्याआधी पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकनं पाकिस्तानी टीमला सल्ला दिला आहे. 

भारताविरुद्ध खेळताना आमच्या डोक्यामध्ये अनेक गोष्टी येत असतात. या गोष्टी बाहेर काढून आम्हाला खेळावं लागेल, असं मलिक म्हणाला आहे. तसंच या मॅचमध्ये जो खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करेल तो हिरो होईल, अशी प्रतिक्रिया मलिकनं दिली आहे. 

भारताविरुद्ध मी दुसऱ्यांविरुद्ध जसा खेळतो तसा खेळत नाही, अशी कबुलीही मलिकनं दिली आहे. या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची टीम प्रमुख दावेदार नाही हे चांगलं आहे. 1992 चा वर्ल्ड कप आणि 2009 मधला टी-20 वर्ल्ड कपवेळीही अशीच परिस्थिती होती. या दोन्ही वेळेला आमचा विजय झाला, असं मलिक म्हणाला आहे.