धक्कादायक: बॉलर मरता मरता वाचला

क्रिकेटच्या मैदानातले धक्कादायक प्रकार आपण अनेकवेळा पाहिले आहेत. असाच काहीसा प्रकार बांग्लादेश आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या मॅचमध्ये घडला होता. 

Updated: Apr 28, 2016, 06:31 PM IST
धक्कादायक: बॉलर मरता मरता वाचला title=

मुंबई: क्रिकेटच्या मैदानातले धक्कादायक प्रकार आपण अनेकवेळा पाहिले आहेत. असाच काहीसा प्रकार बांग्लादेश आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या मॅचमध्ये घडला होता. 

झिम्बाव्बेचा बॉलर किगन मिथ बॉलिंग करत असताना बांग्लादेशच्या नासिर हुसेननं स्ट्रेट ड्राईव्ह मारला. हा बॉल जाऊन थेट मिथच्या तोंडावर बसला. यामुळे मिथ पिचवर रक्ताच्या थारोळ्यात पडला. सुदैवानं मिथ या अपघातातून वाचला, पण त्याला आपले चार दात गमवावे लागले. 

काय झालं नेमकं ? पाहा हा व्हिडिओ