टीम इंडियात स्थान न मिळाल्यानं श्रेयस अय्यर नाराज

भारताच्या आगामी झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या टीममध्ये मुंबईच्या श्रेयस अय्यरला संधी मिळाली नाही.

Updated: May 31, 2016, 04:47 PM IST
टीम इंडियात स्थान न मिळाल्यानं श्रेयस अय्यर नाराज title=

मुंबई : भारताच्या आगामी झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या टीममध्ये मुंबईच्या श्रेयस अय्यरला संधी मिळाली नाही. यामुळे मी नाराज असल्याची प्रतिक्रिया श्रेयस अय्यरनं दिली आहे. 

टीममध्ये स्थान मिळालं नाही तरी मी यापेक्षा चांगला खेळीन आणि एक दिवस भारताकडून नक्की खेळीन असं तो म्हणाला आहे. टीममध्ये निवड न झाल्यानं आणखी रन करण्यासाठी मला उत्तेजन मिळाल्याचं वक्तव्य श्रेयस अय्यरनं केलं आहे.  

21 वर्षांच्या श्रेयस अय्यरनं यंदाच्या रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळताना तब्बल 1,321 रन केल्या. मुंबईला 41 व्यांदा रणजी ट्रॉफी जिंकवण्यातही श्रेयस अय्यरनं महत्त्वाची भूमिका बजावली होती. 

रणजीमध्ये खोऱ्यानं रन काढणाऱ्या अय्यरला आयपीएलमध्ये मात्र फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. दिल्लीकडून खेळताना अय्यरनं 6 मॅचमध्ये फक्त 30 रन केल्या.