अश्विन-जडेजाने रचला इतिहास, संयुक्तरित्या अव्वल स्थानी विराजमान

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या भारताच्या रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी नवा इतिहास रचलाय.

Updated: Mar 9, 2017, 10:54 AM IST
अश्विन-जडेजाने रचला इतिहास, संयुक्तरित्या अव्वल स्थानी विराजमान title=

दुबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या भारताच्या रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी नवा इतिहास रचलाय.

अश्विन आणि जडेजाने कसोटी क्रमवारीत संयुक्तरित्या अव्वल स्थान मिळवलेय. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताने ७५ धावांनी त्यांचा पराभव केला.

य़ानंतर जाहीर केलेल्या क्रमवारीत कसोटी क्रमवारीत अश्विन आणि जडेजा यांनी संयुक्तरित्या अव्वल स्थान पटकावलेय. जडेजाचे कारकिर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. 

२००८नंतर हे पहिल्यांदा असं घडलंय. याआधी २००८मध्ये दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन आणि श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन यांनी संयुक्तरित्या अव्वल स्थान पटकावले होते.