हैदराबाद : आयपीएलच्या दहाव्या हंगामात रविवारी सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यादरम्यानच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये मैदानात चांगलीच खडाजंगी रंगली.
युवा गोलंदाज सिद्धार्थ कौल आणि केकेआरचा रॉबिन उथप्पा मैदानावरच एकमेकांशी भिडले. दरम्यान युवराजने ही स्थिती चांगल्या पद्धतीने सांभाळून घेतली आणि प्रकरण मिटवले.
तिसऱ्या ओव्हरमध्ये कौल गोलंदाजी करत होता. त्याच्या पहिल्या चेंडूवर उथप्पाने चौकार लगावला. यावेळी समोरासमोरुन येणाऱ्या उथप्पा आणि कौल यांच्या धक्काबुक्की झाली. दरम्यान यावेळी कौल काहीच म्हणाला नाही. यानंतर अंपायरने उथप्पाशी संवाद साधला. त्यानंतर पुढच्याच चेंडूला युवराजने दुरुनच उथप्पाला असे काही सांगितले की त्यानंतर उथप्पाने पुन्हा स्लोजिंग केली नाही.
पाहा हा व्हिडीओ