'आयपीएल' टीम खेरदीसाठी फ्लिपकार्ट, स्नॅपडील उत्सुक

'आयपीएल'मधील फिक्सिंग प्रकरणात लोढा समितीने दिलेल्या निर्णयानंतर, चेन्नई सुपर किंग आणि राजस्थान रॉयल्स या दोन टीम्सची जागा भरून काढायला फ्लिपकार्ट, स्नॅपडीलसारख्या ऑनलाईन शॉपिंग कंपन्या पुढे यायला तयार आहेत.

Updated: Jul 18, 2015, 11:06 AM IST
'आयपीएल' टीम खेरदीसाठी फ्लिपकार्ट, स्नॅपडील उत्सुक title=

नवी दिल्ली : 'आयपीएल'मधील फिक्सिंग प्रकरणात लोढा समितीने दिलेल्या निर्णयानंतर, चेन्नई सुपर किंग आणि राजस्थान रॉयल्स या दोन टीम्सची जागा भरून काढायला फ्लिपकार्ट, स्नॅपडीलसारख्या ऑनलाईन शॉपिंग कंपन्या पुढे यायला तयार आहेत.

लोढा समितीकडून चेन्नई सुपर किंग आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही टीम्सवर, दोन वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. 

सोनीच्या करारानुसार आयपीएलच्या साठ मॅचेस खेळणे सक्तीचे आहे. त्यामुळे आठ टीम्स खेळवाव्या लागतील. 

ऑनलाईन शॉपिंग कंपनी जसे फ्लिपकार्ट, स्नॅपडील, अॅमेझॉन, पेटीएम यासारख्या कंपन्या आयपीएलची टीम खरेदी करण्याच्या विचारात आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.