पीच क्युरेट आणि मॅनेजमेंटमध्ये यापूर्वी झालेले ५ वाद

वानखेडेवर झालेल्या दारुण पराभवाची कारण शोधल्यास या पराभवाला खराब कामगिरी हेच खरं कारण ठरेल. तरीही टीम इंडियाचे डायरेक्टर रवी शास्त्रींनी पराभवाचं खापर क्युरेटर सुधीर नाईकांवर फोडलय. यापूर्वीही टीम इंडिया मॅनेजमेंट आणि क्युरेटर यांच्यामध्ये अनेकदा वादविवाद झाले आहेत. याचा घेतलेला हा आढवा...

Updated: Oct 27, 2015, 06:55 PM IST
पीच क्युरेट आणि मॅनेजमेंटमध्ये यापूर्वी झालेले ५ वाद  title=

मुंबई : वानखेडेवर झालेल्या दारुण पराभवाची कारण शोधल्यास या पराभवाला खराब कामगिरी हेच खरं कारण ठरेल. तरीही टीम इंडियाचे डायरेक्टर रवी शास्त्रींनी पराभवाचं खापर क्युरेटर सुधीर नाईकांवर फोडलय. यापूर्वीही टीम इंडिया मॅनेजमेंट आणि क्युरेटर यांच्यामध्ये अनेकदा वादविवाद झाले आहेत. याचा घेतलेला हा आढवा...

वानखेडवर टीम इंडिया अतिशय वाईटरित्या पराभूत झाली. याची कारण अनेक आहेत. मात्र टीम इंडियाचे डायरेक्टर रवी शास्त्री यांनी वानखेडेचं पिच तयार करणा-या सुधीर नाईकांनाच जबाबदार धरलय. यामुळे रवी शास्त्री आणि वानखेडेचे पिच क्युरेटर सुधीर नाईक यांच्यामध्ये जुंपली असून नाईक यांनी मुंबई क्रिकेट संघटनेकडे याबाबत तक्रारही केलीय. या वादाचं पुढे काय होईल माहित नाही. मात्र टीम इंडियाकडून नेहमीच स्पिनरला फ्रेंडली पिचची मागणी केली जाते...आणि अशा पिचवर मग टीम इंडियाचे स्पिनर्स दादागिरी करतात. टीम इंडियाला पाहिजे तसं पिच तयार केलं जात नाही तेव्हा तेव्हा टीम इंडिया पराभूत झाली असून पिचबाबत वादही निर्माण झाले आहेत. टीम इंडियाचा कॅप्टन आणि क्युरेटरमधील वाद याआधीही निर्माण झाले आहेत. 

चेपॉकच्या पिचवरुन वाद (2013)
अगदी एक-दीड वर्षांपूर्वी म्हणजे 2013मध्ये ऑस्ट्रेलिया टीम भारतात आली होती...आणि टीम इंडियाला पाच टेस्टची सीरिज 5-0नं क्लिन स्विप करण्याची संधी होती. मात्र अखेरच्या चेन्नई टेस्टमध्ये चेपॉकचं पिच हे फास्ट बॉलर्सना फ्रेंडली करण्यात आलं आणि टीम इंडियाचं क्लिन स्विपचं स्वप्न भंगलं. तत्पूर्वी हैदराबाद, मोहाली आणि दिल्लीच्या पिचवर भारतीय स्पिनर्सनं धमाका केला होता. 

 

धोनी-क्युरेटर मुखर्जीमध्ये जुंपली (2012)
2012मध्ये कॅप्टन धोनी आणि ईडन गार्डनचे क्युरेटर प्रबीर मुखर्जी यांच्यामध्ये चांगलेच मतभेद निर्माण झाले होते. धोनीला पाहिजे तसं पिच तयार करु शकत नसल्याची जाहीर भूमिका त्यावेळी मुखर्जी यांनी घेतली होती. हे प्रकरण एवढं गाजलं होतं की त्यावेळी मुखर्जी हे काही काळासाठी सुट्टीवरदेखील गेले होते. या टेस्टमध्ये टीम इंडियाला इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता. 

ग्रीन पार्क पिचबाबत ICCचा इशारा (2008)
यापूर्वी 2008मध्ये दक्षिण आफ्रिका भारतीय दौ-यावर असताना कानपूर टेस्ट एवढी वाईट होतं की अखेर आयसीसीला वॉर्निंग द्यावी लागली होती. या ड्राय पिचवर टीम इंडियानं हेल्पलेस झालेल्या प्रोटीयाजविरुद्ध सहज विजय साकारला होता.

नागपूर पिचवरुन गांगुली-मनोहर वाद (2004)
तर 2004मध्ये ऑस्ट्रेलिया टीम भारतात आली होती आणि त्यांनी पहिली टेस्ट जिंकली होती. त्यानंतर चेन्नई टेस्ट पावसात वाहून गेल्यानंतर नागपूर टेस्टमध्ये टीम इंडियाला बरोबरी साधण्याची संधी होती. मात्र नागपूरचं पिच ग्रीनच ठेवण्यात आल्यानं कॅप्टन सौरव गांगुली आणि शशांक मनोहरांमध्ये मतभेद झाले होते. पिचवरील ग्रास कमी करण्याची टीम इंडियाची विनंती तेव्हाचे विदर्भ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी धुडकावून लावली होती. ही टेस्ट जिंकत कांगारुनीं सीरिजवरही कब्जा केला होता.

वानखेडेच्या पिचवरुन वाद (2001)
2001मध्ये कॅप्टन सौरव गांगुली आणि वानखेडेचे क्युरेटरमध्ये पिचवरुन वाद निर्माण झाला होता. पिचवरील प्रत्येक गवताचं पात कापणं कठीण असल्याचं क्युरेटरनं आधी सांगितलं होत. मात्र तरीही टीम इंडियाला हवी तशी पिच मिळाली एवढ करुनही चार दिवसांपेक्षा कमी वेळेत ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाला 10 विकेट्सनं धुळ चारली होती. 

आता पुन्हा एकदा क्युरेटर आणि टीम इंडियामध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. आता पराभवासाठी केवळ विकेट जबाबदार आहे की टीम इंडियाची कामगिरीही तेवढीच जबाबदार हे सच्चा क्रिकेटप्रेमींना चांगलंच ठाऊक आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.