VIDEO : सुरेश रैना म्हणतोय, तू मिली सब मिला...

क्रिकेट जगतात अनेक रेकॉर्डस आपल्या नावावर नोंदवणाऱ्या क्रिकेटर सुरेश रैनानं आता संगीतातही आपला जलवा दाखवायला सुरुवात केलीय. 

Updated: Sep 8, 2015, 11:29 AM IST
VIDEO : सुरेश रैना म्हणतोय, तू मिली सब मिला...  title=

नवी दिल्ली : क्रिकेट जगतात अनेक रेकॉर्डस आपल्या नावावर नोंदवणाऱ्या क्रिकेटर सुरेश रैनानं आता संगीतातही आपला जलवा दाखवायला सुरुवात केलीय. 

अधिक वाचा - ललित मोदींच्या ई-मेलमुळे सुरेश रैना सक्तीची विश्रांती?

'मिरुथिया गँगस्टर्स' या सिनेमातील एका गाण्याला रैनानं आपला आवाज दिलाय. सुरेश रैनाचं पहिलं वहिलं गाणं 'तू मिली सब मिला' हे गाणं सोमवारी मुंबईत प्रदर्शित करण्यात आलंय.

अधिक वाचा - रैनाचा पत्नी प्रियांका सोबतचा पहिला सेल्फी!

हे गाणं गाताना आपण खूपच एन्जॉय केल्याचं सुरेशनं म्हटलंय. पण, क्रिकेट हीच माझी खरी पॅशन आहे, हे सांगायलाही तो विसरला नाही. म्युझिक मात्र मला मध्ये मध्ये खूप चांगला ब्रेक देतं, असं रैना म्हणतोय.
 
ऐका रैनाच्या आवाजातलं हे गाणं... 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.