विराटबद्दल असं काही बोलला स्मिथ

विराट कोहली अत्यंत सुंदर खेळला त्याने आमच्याकडून सामान खेचून नेला, असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथ सामना संपल्यानंतर झालेल्या प्रेझेंटेशनमध्ये बोलत होता.

Updated: Mar 27, 2016, 11:48 PM IST
विराटबद्दल असं काही बोलला स्मिथ title=

मोहाली :  विराट कोहली अत्यंत सुंदर खेळला त्याने आमच्याकडून सामान खेचून नेला, असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथ सामना संपल्यानंतर झालेल्या प्रेझेंटेशनमध्ये बोलत होता.

काही काळासाठी आम्हांला वाटले होते की सामना आमच्या ताब्यात आहे. पण विराटने फॉकनरच्या ओव्हरमध्ये संपूर्ण सामना आमच्या ताब्यातून भारताकडे झुकवला.

पहिला सामना न्यूझीलंडशी ८ धावांनी गमावल्यानंतर आम्ही चांगला खेळ केला. पण आज भारताने ज्या खेळाचं प्रदर्शन केले ते आमच्यापेक्षा चांगल होतं. भारताला पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा असे स्मिथने सांगितले.