विराटने पाठविले या खेळाडूला रिकाम्या हाताने...

भारताला नमवून सेमी फायनल आणि नंतर फायनलमध्ये जाऊन ऑस्ट्रेलियासाठी पहिला वहिला टी-२० वर्ल्डकप नेण्याचे शेन वॉटसनचे स्वप्न भारताच्या विराट कोहलीने भंग केले.

Updated: Mar 27, 2016, 11:46 PM IST
विराटने पाठविले या खेळाडूला रिकाम्या हाताने... title=
मोहाली : भारताला नमवून सेमी फायनल आणि नंतर फायनलमध्ये जाऊन ऑस्ट्रेलियासाठी पहिला वहिला टी-२० वर्ल्डकप नेण्याचे शेन वॉटसनचे स्वप्न भारताच्या विराट कोहलीने भंग केले.
 
वॉटसनसाठी हा टी-२० मधील अखेरचा सामना ठरला. ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर असलेल्या वॉटसन हा वन डे तील वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य आहे. पण त्यांनी आतापर्यंत त्यांनी टी-२० वर्ल्ड कप जिंकला नाही.
 
पाकिस्तानच्या सामन्यापूर्वी वॉटसनने निवृत्तीची घोषणा केली होती. पण त्याला आता खाली हात जावे लागणार आहे. 
 
वॉटसनची जबरदस्त कामगिरी

वॉटसनने सुरूवातीला १८ धावा काढल्या. त्यानंतर गोलंदाजी करताना ४ ओव्हरमध्ये २३ धावा देऊन २ विकेट घेतल्या आणि त्यानंतर एक अप्रतिम कॅच घेतला.