शिखर धवन यामुळे आहे आऊट ऑफ फॉर्म

भारताचा ओपनर शिखर धवन सध्या खराब फॉर्मात

Updated: Apr 20, 2016, 10:37 AM IST
शिखर धवन यामुळे आहे आऊट ऑफ फॉर्म title=

मुंबई : भारताचा ओपनर शिखर धवन सध्या खराब फॉर्मात आहे. आयपीएलमध्ये ही तो काही जास्त कमाल करु शकलेला नाही. यावर भारताचे दिग्गज माजी क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी वक्तव्य केलं आहे. गावस्करांनी म्हटलं की त्याच्यावर परफॉरर्मंस करण्याचं प्रेशर आहे. धवन जेव्हा ही अपयशी होतो तेव्हा लोकं त्यांने याआधी बनवलेले रन विसरून जातात.

लिमिटेड ओव्हर मॅचमध्ये त्याने ९ शतक केले आहे. त्याच्या स्लो फुटवर्कमुळे तो चांगली खेळी करु शकत नाही आहे. मी त्याला लांब उड्या मारण्याचा सल्ला देतो यामुळे त्याला नक्की फायदा होईल असं देखील गावस्कर यांनी म्हटलं आहे.

गावस्कारांनी या गौतम गंभीरचं देखील कौतूक केलं जो सध्या आयपीएलमध्ये सर्वाधिक रन करणारा बॅट्समन आहे. तो आज ही भारतीय टीममध्ये ओपनिंगसाठी येऊ शकतो असं देखील त्यांनी म्हटलं आहे.