आयपीएल फायनलच्या दोन्ही टीम ठरल्या

आयपीएलच्या दुसऱ्या एलिमिनेटर मॅचमध्ये सनराजर्स हैदराबादनं गुजरात लायन्सचा 4 विकेट्सनं पराभव केला आहे.

Updated: May 27, 2016, 11:47 PM IST
आयपीएल फायनलच्या दोन्ही टीम ठरल्या title=

नवी दिल्ली : आयपीएलच्या दुसऱ्या एलिमिनेटर मॅचमध्ये सनराजर्स हैदराबादनं गुजरात लायन्सचा 4 विकेट्सनं पराभव केला आहे. त्यामुळे आता रविवारी होणारी फायनल सनराजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरमध्ये होईल. 

नवी दिल्लीच्या फिरोजशहा कोटलामध्ये झालेल्या या मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबादनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. गुजरातनं आपल्या 20 ओव्हरमध्ये 162 रन केल्या. हैदराबादकडून ऍरोन फिंचनं सर्वाधिक 50 रन केल्या.

163 रनचा पाठलाग करायला आलेल्या हैदराबादची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. स्कोअरबोर्डवर फक्त 6 रन असताना ओपनर शिखर धवन शून्य रनवर आऊट झाला. पण कॅप्टन डेव्हिड वॉर्नरनं एकहाती लढत देऊन हैदराबादचा विजय खेचून आणला. वॉर्नरनं 58 बॉलमध्ये 93 रनची खेळी केली. यामध्ये 11 फोर आणि तीन सिक्सचा समावेश होता. 

वॉर्नरला तळाला आलेल्या बिपूल शर्मानंही चांगली साथ दिली. बिपूलनं 11 बॉलमध्ये 27 रन केल्या, यात तीन सिक्सचा समावेश होता. हैदराबादच्या इतर बॅट्समनना मात्र फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही.