कुस्तीचा वाद आता कोर्टात

दोन वेळा ऑलिम्पिकचं मेडल पटकवाणारा कुस्तीपटू सुशीलकुमार रिओ ऑलिम्पिक 2016मध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी आता कोर्टात गेला आहे

Updated: May 16, 2016, 06:14 PM IST
कुस्तीचा वाद आता कोर्टात title=

नवी दिल्ली: दोन वेळा ऑलिम्पिकचं मेडल पटकवाणारा कुस्तीपटू सुशीलकुमार रिओ ऑलिम्पिक 2016मध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी आता कोर्टात गेला आहे. दिल्ली उच्च न्यायालयामध्ये याबाबतची सुनावणी मंगळवारी होणार आहे. 

रिओ ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठी आपली आणि नरसिंग यादवची कुस्तीची मॅच खेळवण्यात यावी, यामध्ये जो जिंकेल त्याला रिओच्या ऑलिम्पिकमध्ये पाठवण्यात यावं, ही मागणी सुशीलकुमारनं केली आहे. 

दरम्यान भारताला मी ऑलिम्पिकचा कोटा मिळवून दिल्यामुळे मला रिओचं तिकीट मिळायलाच पाहिजे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचा कुस्तीपटू नरसिंग यादवनं दिली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनीही या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करायला नकार दिला आहे. 

रिओ ऑलिम्पिकमध्ये पात्र होण्यासाठी झालेली वर्ल्ड चॅम्पियनशिप सुशीलकुमार दुखापतग्रस्त झाल्यामुळे मुकला होता, त्याच्याबदल्यात नरसिंग यादवला संधी मिळाली.