ईडन गार्डनवर आज टी-२०ची फायनल

टी-20 वर्ल्ड कपची फायनल आज कोलकत्ताच्या ईडन गार्डनवर रंगणार आहे. फायनलमध्ये वेस्ट इंडिज आणि इंग्लड एकमेकांशी दोन हात करणार आहेत. 

Updated: Apr 3, 2016, 08:41 AM IST
ईडन गार्डनवर आज टी-२०ची फायनल title=
सौजन्य - ट्विटर

कोलकाता : टी-20 वर्ल्ड कपची फायनल आज कोलकत्ताच्या ईडन गार्डनवर रंगणार आहे. फायनलमध्ये वेस्ट इंडिज आणि इंग्लड एकमेकांशी दोन हात करणार आहेत. 

या दोन्ही संघांनी यापूर्वी वर्ल्डकपचा खिताब जिंकलाय. त्यामुळे आता 2016 च्या टी-20 वर्ल्ड कपचा किताब कोण पटकावणार याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागुन राहीलय.

इंग्लंड संघाने न्यूझीलंडवर विजय मिळवत फायनल गाठली. तर सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडिजने भारताचा पराभव केला आणि फायनलमध्ये प्रवेश केला. डॅरेन सॅमीच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजचा संघ चांगली कामगिरी करतोय. तर दुसरीकडे इंग्लंडनेही आतापर्यंतच्या वर्ल्डकपच्या प्रवासात चांगली कामगिरी केलीये.