बंगळुरु : टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिकेसाठी आज निवड करण्यात आली. टीम इंडियाचं नेतृत्व या दोन्ही मालिकांमध्ये महेन्द्रसिंग धोनी करणार आहे.
टीम इंडियात शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहसी, सुरेश रैना आणि अजिंक्य रहाणे यांची निवड निश्चित झाली आहे.
पंजाबचा नवोदीत खेळाडू गुरकीरत मानचा वन डे टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. भारताच्या ट्वेण्टी20 संघात अनुभवी हरभजन सिंगसोबतच कर्नाटकच्या श्रीनाथ अरविंदला स्थान मिळालं आहे.
बंळुरूमध्ये आज संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय निवड समितीच्या बैठकीत दोन्ही टीम्सची घोषणा करण्यात आली.
पहिल्या तीन वनडे सामन्यासाठी टीम इंडिया
महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अंबाती रायडू, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, स्टुअर्ट बिन्नी, आर. अश्विन, गुरकिरत मान, अमित मिश्रा, भुवनेश्वर कुमार, मोहित शर्मा, उमेश यादव
टी-20 साठी टीम इंडिय़ा
महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, स्टुअर्ट बिन्नी, आर. अश्विन, अक्षर पटेल, हरभजन सिंह, भुवनेश्वर कुमार, मोहित शर्मा, अमित मिश्रा, एस. अरविंद
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.