टीम इंडियाच्या नावे 'सलग ऑल आऊट करण्याचा रेकॉर्ड'

 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताने एक नवा रेकॉर्ड केला आहे.  टीम इंडियाने आयरलँड टीमला ५० षटकांआधीच ऑल आऊट केलं. टीम इंडियाने वर्ल्डकपमध्ये लगोपाठ पाच टीम्सना ऑल आऊट केल्याचा रेकॉर्ड केला आहे. भारताच्या आक्रमक गोलंदाजीसमोर आयरलँडची टीम २५९ वर ऑल आऊट झाली. 

Updated: Mar 10, 2015, 12:21 PM IST
टीम इंडियाच्या नावे 'सलग ऑल आऊट करण्याचा रेकॉर्ड' title=

हॅमिल्टन :  क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताने एक नवा रेकॉर्ड केला आहे.  टीम इंडियाने आयरलँड टीमला ५० षटकांआधीच ऑल आऊट केलं. टीम इंडियाने वर्ल्डकपमध्ये लगोपाठ पाच टीम्सना ऑल आऊट केल्याचा रेकॉर्ड केला आहे. भारताच्या आक्रमक गोलंदाजीसमोर आयरलँडची टीम २५९ वर ऑल आऊट झाली. 

भारताने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचं आमंत्रण आयरलँडला दिलं, आयसीसी क्रिकेट कपमध्ये ग्रुप बी मध्ये आयरलँडला भारताने ४९ षटकांत २५९ धावांवर गारद केलं. आयरलँडकडून नियल ओ ब्रायनने ७५ आणि कॅप्टन विल्यम पोर्टरफील्डने ६७ रन्स केले. भारताकडून मोहम्मद शमीने तीन आणि रविचंद्रन अश्विनने दोन विकेट घेतल्या.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.