टी-२० सीरिज पाठोपाठ टीम इंडियानं पहिली वनडेही गमावली

दक्षिण आफ्रिकेसोबतच्या पहिल्या वनडे मॅचमध्ये आज रोहित शर्मानं खेळलेली दीडशे रन्सचा खेळी वाया गेलीय. भारतानं पहिली वनडे मॅच ५ रन्सनं गमावली.

Updated: Oct 11, 2015, 05:20 PM IST
टी-२० सीरिज पाठोपाठ टीम इंडियानं पहिली वनडेही गमावली title=

कानपूर: दक्षिण आफ्रिकेसोबतच्या पहिल्या वनडे मॅचमध्ये आज रोहित शर्मानं खेळलेली दीडशे रन्सचा खेळी वाया गेलीय. भारतानं पहिली वनडे मॅच ५ रन्सनं गमावली.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलामीवीर रोहित शर्माच्या दमदार शतकानं पकड मजबूत केली होती. त्याला अजिंक्य रहाणेनं चांगली साथ दिली. पण अजिंक्यची विकेट जाताच आलेला प्रत्येक खेळाडू पटापट आऊट झाला आणि भारतानं अखेरच्या ओव्हरमध्ये दोन विकेट गमावत मॅच गमावली.  

आणखी वाचा - स्कोअरकार्ड: भारत vs दक्षिण आफ्रिका कानपूर वनडे LIVE

यापूर्वी दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. क्विंटन डिकॉक आणि हाशिम आमला ही जोडी संघाच्या ४५ धावा झाला असताना फुटली. डिकॉक २९ धावांवर बाद झाला. यांनतर आमलानं फाफू डू प्लेसिसच्या साथीने आफ्रिकेला शंभरी गाठून दिली. आमला ३७ धावांवर बाद झाला. प्लेसिस अर्धशतक ठोकून डिव्हिलियर्सच्या साथीने संघाचा डाव पुढे नेला. प्लेसिस ६२ धावांवर बाद झाल्यावर डेव्हिड मिलर आणि जेपी ड्यूमिनी हे दोघं स्वस्तात माघारी परतल्यानं आफ्रिकेची अवस्था ४५.१ षटकांत ५ बाद २३८ अशी अवस्था झाली होती. 

पण त्यानंतर डिव्हिलियर्सनं फरहान बेहरदीनच्या साथीनं भारतीय गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. डिव्हिलिर्यसनं शेवटच्या चेंडूवर षटकात ठोकून शतक ठोकलं. तर बेहरदीननं १९ चेंडूंमध्ये नाबाद ३५ धावा केल्या. भारतातर्फे उमेश यादव आणि अमित मिश्राने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर आर अश्विननं एक विकेट घेतली. आफ्रिकेनं ५० षटकात ५ गडी गमावत ३०३ रन्स केले.

आणखी वाचा - विराट कोहलीला मोजावी लागली लज्जास्पद पराभवाची किंमत

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.