वेस्ट इंडिज दौऱ्याआधी टीम इंडियाचा योगाभ्यास

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाचा जोरदार सराव सुरु आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे या दौऱ्यासाठी विशेष तयारी करताना दिसतायत. वेस्ट इंडिज दौऱ्याआधी टीम इंडियाने योगा सेशनमध्ये भाग घेतला. 

Updated: Jul 2, 2016, 01:53 PM IST
वेस्ट इंडिज दौऱ्याआधी टीम इंडियाचा योगाभ्यास title=

बंगळूरु : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाचा जोरदार सराव सुरु आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे या दौऱ्यासाठी विशेष तयारी करताना दिसतायत. वेस्ट इंडिज दौऱ्याआधी टीम इंडियाने योगा सेशनमध्ये भाग घेतला. 

कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यात चार कसोटी सामने खेळणार आहे. यासाठी बंगळूरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव सत्रात टीम इंडियाचा सराव सुरु आहे. 

टीम इंडियाच्या योगा सेशनमध्ये कोहलीसह अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद शामी, उमेश यादव यांनी सहभाग घेतला होता. यावेळी टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगरही उपस्थित होते. 

२१ जुलैपासून वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यानंतर न्यूझीलंड टीम भारत दौऱ्यावर येत आहे.