पराभवानंतर अंडरटेकरचा WWEला अलविदा

९०च्या दशकातील मुलांचा फेव्हरिट डेडमॅन अंडरटेकर २७ वर्षानंतर WWEमधून निवृत्त होतोय.

Updated: Apr 3, 2017, 01:39 PM IST
पराभवानंतर अंडरटेकरचा WWEला अलविदा title=

मुंबई : ९०च्या दशकातील मुलांचा फेव्हरिट डेडमॅन अंडरटेकर २७ वर्षानंतर WWEमधून निवृत्त होतोय.

रेसलमेनिया ३३मधील अखेरच्या सामन्यात रोमन रेंसकडून अंडरटेकरला हार पत्करावी लागली. या सामन्यात जरी अंडरटेकरचा पराभव झाला असला तरी त्याचा हा शेवटचा सामना त्याच्या चाहत्यांसाठी नक्कीच आठवणीतला सामना असेल.

रेसलमेनियाच्या मुख्य स्पर्धेत अंडरटेकर आणि रोमन रेंस यांच्यात सामना रंगला. मात्र या सामन्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला. रेसलमेनियामध्ये अंडरटेकरचा रेकॉर्ड २३-२ इतका राहिला. या पराभवानंतर अंडरटेकरने डब्ल्यूडब्ल्यूईमधून निवृत्ती घेतलीये. 

तब्बल २७ वर्षानंतर त्याची डब्ल्यूडब्ल्यूईमधील कारकीर्द अखेर संपतेय. या कारकिर्दीत त्याच्यावर चाहत्यांनी मनापासून प्रेम केले.